पनवेलच्या सहाय्यक आयुक्तांना तासगावच्या शेतकऱ्याने दिले लाख लाख धन्यवाद! 

जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना ही घटना घडली.
पनवेलच्या सहाय्यक आयुक्तांना तासगावच्या शेतकऱ्याने दिले लाख लाख धन्यवाद! 

तासगाव (सांगली): एका महिला अधिकाऱ्याने प्रसंगावधान राखत पेटलेला तब्बल एक एकर ऊस विझवून शेतकऱ्याचे होणारे लाखो रुपयांचे नुकसान टाळले. शेतकऱ्याने त्या महिला अधिकाऱ्याला लाख लाख धन्यवाद दिले. 

पनवेल महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त असलेल्या आणि मूळच्या तासगावच्या असलेल्या तेजस्विनी गलांडे ह्या सुटी साठी तासगावात आल्या आहेत. आज दुपारी त्या शहराच्या हद्दीतच असलेल्या आपल्या शेतात आईसह फेरफटका मारण्यास गेल्या होत्या. फिरत असताना शेजारी मळा असलेल्या सविता दादासो पाटील यांच्या दोन एकर उसाला विद्युत तारामध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. दुपारची वेळ आजूबाजूला कोणी नाही. ज्यांच्या उसाला आग लागली ते ही त्या ठिकाणी नव्हते. आग झपाट्याने पसरत होती. आग विझली नसती तर संपूर्ण ऊस जळण्याचा धोका होता. हा सारा प्रकार पाहून तेथे असलेल्या तेजस्विनी गलांडेही गडबडून गेल्या. मात्र त्यांनी लगेचच प्रसंगाचे गांभीर्य ओळखत प्रथम वीज वितरण कंपनीत फोन करून वीजप्रवाह बंद करायला लावला. मोबाईल मधील संपर्क वापरून नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना आगीची माहिती देऊन अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशामक दलाची गाडीही कर्मचाऱ्यांसह वेळेवर पोहोचून तातडीने आग विझवली. आग विझवण्यासाठीही गलांडे यांनी मदत केली. वेळेवर दरम्यान त्या घटनास्थळी विद्युत वितरणचे अधिकारीही पोहोचल.आग विझल्याने त्या शेतकऱ्याचा ऊस तर वाचलाच पण आग आणखी भडकली असती तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com