asim saraode and chudhari | Sarkarnama

विश्‍वंभर चौधरी व असीम सरोदे यांना पोलिस संरक्षण

उमेश घोंगडे
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

पुणे : सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी तसेच ऍड. असीम सरोदे यांना आज पुणे पोलिसांनी पोलीस संरक्षण दिले आहे. अशाप्रकारे पोलिसांनी राज्यभर आतापर्यंत 48 कार्यकर्त्यांना संरक्षण दिलेले आहे. विशेष म्हणजे या दोघांना संरक्षण का देण्यात आले याबाबत पोलिसांनी या दोघांनाही काही माहिती दिलेली नाही. संरक्षण का देण्यात आले याची माहिती पोलिसांनी द्यावी, अशी अपेक्षा ऍड. सरोदे यांनी व्यक्त केली आहे. 

मला का संरक्षण देण्यात आले याची माहिती पोलिसांनी किमान आम्हाला सांगावी, अशी अपेक्षा ऍड. सरोदे यांनी व्यक्त केली. चौधरी व सरोदे हे दोघेही आपआपला व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. विविध विषयावर त्यांनी वेळोवेळी थेट भूमिका घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच ऍड. गोविंद पानसरे यांच्या हत्या करणाऱ्यांना लवकर अटक करून शिक्षा व्हावी, यासाठी या दोघांनीही वेळोवेळी भूमिका घेतली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर या दोघांना संरक्षण देण्यामागे पोलिसांकडे नेमकी ठोस अशी माहिती आली असावी. त्यामुळे पोलिसांनी आज तातडीने पोलीस संरक्षण दिले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील अशा 48 व्यक्तींना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात येते. पोलीस खात्याच्या दृष्टीने हा कामाचा भाग असला तरी ज्यांना संरक्षण देण्यात आले. त्यांना तरी त्याचे कारण सांगण्यात यावे, अशी अपेक्षा करण्यात येते. मात्र या दोघांबाबत पोलिसांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. 

संबंधित लेख