asim munir new isi chief | Sarkarnama

 असीम मुनीर "आयएसआय'चे नवे प्रमुख 

वृत्तसंस्था
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

इस्लामाबाद : पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या माध्यम विभागाकडून देण्यात आली. 

"आयएसआय'चे मावळते प्रमुख लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा मुनीर घेतील. मुनीर यांनी या पूर्वी लष्कराच्या गुप्तचर खात्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांच्या अध्यक्षतेखालील लष्कर पदोन्नती बोर्डाने काही दिवसांपूर्वीच पदोन्नतीद्वारे मुनीर यांना लेफ्टनंट जनरल ही पदवी प्रदान केली होती. मुनीर हे डिसेंबर 2016मध्ये आयएसआयच्या प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. 

संबंधित लेख