भाईंदरच्या खाड़ीत नऊ ठिकाणी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधणार

11 एप्रिल 2016 रोजी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन दुसऱया दिवशी त्यांच्या मृतदेहाची भाईंदरच्या खाडीमध्ये विल्हेवाट लावली होती. या घटनेला गेल्या गुरुवारी दोन वर्षे पुर्ण झाली आहेत.
Ashwini-Gore-Bindre
Ashwini-Gore-Bindre

नवी मुंबई :  सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष  ओशियन सायन्स ऍन्ड सर्व्हायविंग प्रा.लि. या खाजगी कंपनीच्या मदतीने सापडणार का याकडे तपास  करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर  याने अश्विनी  बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे  एका लोखंडी पेटीत ठेवून ती पेटी भाईंदरच्या खाड़ीत फेकली असा तपास  करणाऱ्या अधिकाऱ्यांना संशय आहे . 

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधणाऱया ओशियन सायन्स ऍन्ड सर्व्हायविंग प्रा.लि. या खाजगी कंपनीने गत आठवडय़ात भाईंदरच्या खाडीमध्ये राबविलेल्या शोध मोहीमे नंतर लोखंड सदृश्‍य वस्तू आढळून आलेली नऊ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. 

या नऊ ठिकाणामध्ये नेमकी लोखंडसदृष्य वस्तु कुठे आहे? व ती गाळामध्ये किती खोल आहे, याचा नेमका ठाव घेण्यासाठी आता डायव्हर मॉनोमीटर हे अत्याधुनिक यंत्र इराक येथून आणले जाणार आहे. पुढील आठवडय़ात सदर उपकरणाच्या माध्यमातून निश्‍चित केलेल्या नऊ ठिकाणावर अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधले जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गत आठवडय़ात ओशियन सायन्स ऍन्ड सर्व्हायविंग प्रा.लि. या खाजगी कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाईंदरच्या खाडीमध्ये शोध मोहीम हाती घेतली होती.

या शोध मोहीमेत ओशियन सायन्स ऍन्ड सर्व्हायविंग प्रा.लि. कंपनीने दोन दिवस ग्रॅडीओमीटर या आधुनिक यंत्राच्या माध्यमातून भाईंदरच्या खाडीमध्ये लोखंड सदृष्य वस्तु असलेल्या ठिकाणांचा शोध घेतला. या कंपनीच्या शोध मोहीम पथकाने खाडीतील 9 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. यातील प्रत्येक ठिकाणी पाच मीटरच्या परिघात व एक मीटर जमीनीच्या खोल शोध घतला जाणार आहे.

कंपनीकडून खाडीतील ज्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत, त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्याशिवाय काही ठिकाणी दगड व इतर गाळ त्यावर आलेला आहे. त्यामुळे या गाळात रुतलेली लोखंडदृष्य वस्तु शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना इतर काही खाजगी कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे.

डायव्हर मॅनोमीटर या उपकरणाच्या माध्यमातून पाच मीटर परिघामध्ये व एक मीटर खोल गाळामध्ये लोखंड सदृष्य वस्तु नेमकी कुठे आहे, याचा शोध घेणे सुलभ होणार असल्याने नवी मुंबई पोलिसांनी या उपकरणासह शोध घेऊ शकणाऱया कंपन्यांशी बोलणी सुरु केली आहे. 

डायव्हर मॅनोमीटर हे उपकरण फक्त इराक देशामध्ये आहे. सदर उपकरणाच्या माध्यमातून पुढील आठवडय़ात भाईंदरच्या खाडीतील गाळामध्ये रुतलेल्या लोखंड सदृष्य वस्तूचा नेमका ठावठिकाणा शोधला जाणार आहे. या उपकरणाच्या सहाय्याने लोखंड सदृष्य वस्तु सापडल्यास मृतदेहाचे अवशेष शोधण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याचा जामीन अर्ज पावारी अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश शेवलीकर यांनी फेटाळून लावला. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी अभय कुरुंदकर पाठोपाठ राजेश पाटील याला 10 डिसेंबर रोजी अटक केली आहे. तेव्हांपासून राजेश पाटील हा न्यायालयीन कोठडीत आहे.

11 एप्रिल 2016 रोजी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन दुसऱया दिवशी त्यांच्या मृतदेहाची भाईंदरच्या खाडीमध्ये विल्हेवाट लावली होती. या घटनेला गेल्या गुरुवारी दोन वर्षे पुर्ण झाली आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी मीरा रोड येथील गोल्डन नेस्ट परिसरातील मुकुंद  प्लाझा या इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये डोक्यात बॅट घालून हत्या केली होती. त्यानंतर त्याचा बालमित्र महेश फळणीकर आणि खासगी वाहनचालक कुंदन भंडारी यांच्या मदतीने अश्विनीच्या मृतदेहाचे करवतीने तुकडे करून भाईंदरच्या खाडीत फेकले होते, असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेले आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com