प्रकाश आंबेडकरांचाही गौरी लंकेश करू म्हणणाऱ्यांना अभय आहे का ? : अशोक सोनोने

प्रकाश आंबेडकरांचाही गौरी लंकेश करू म्हणणाऱ्यांना अभय आहे का ? : अशोक सोनोने

अकोला : कोल्हापूर येथील बैठकीत हिंदुत्ववादी संघटनांनी प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य करून त्यांचा गौरी लंकेश करू असे म्हटले आहे. याची माहिती राज्य शासन व पोलिस खात्याकडे असुनही अजुनपर्यंत त्या हिंदुत्ववादी संघटनांवर कारवाई करण्यात आलेली नाही. राज्य शासन व पोलिस विभागाने या हिंदुत्ववादी संघटनांना अभय दिले आहे का ? असा प्रश्न भारिप बहुजम महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी उपस्थित करून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्यात यावी, अशी हिंदुत्वावादी संघटनांनी जी मागणी केली तरी जर पब्लिसिटी स्टंट असेल तर आम्हीही या गोष्टीला गांर्भियाने घेत नाही. परंतु, जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी तसे पोलिसांना पुरावे दाखवून गुन्हे दाखल करावेत. या हिंदुत्ववादी संघटनांनी आजपर्यंत अनके बळी घेतलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. कुलबर्गी, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांनाही संपविण्यात आले. संभाजी भिडे यांनी भिमा कोरेगावच्या दंगलीला प्रकाश आंबेडकर जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांना अटक करावी, अशी जी मागणी केली ती हास्यास्पद आहे. 

कारण स्वतः मिलिंद एकबोटे यांनी सुप्रिम कोर्टात जामीन मिळविण्यासाठी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामध्ये मिलींद एकबोटे असे सांगतात की, मी तर भिमा कोरेगावच्या दंगलीमध्ये दोन नंबरचा आरोपी आहे खरे सुत्रधार व एक नंबरचे आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कत्तल करणार अशी पोस्ट फेसबुकवर रावसाहेब पाटील (संभाजी भिडेंचे समर्थक) यांनी टाकली आणि त्यांना ज्याप्रकारे पोलिस खात्याने अभय दिले तसेच अभय×प्रकाश आंबेडकरांना धमक्‍या देणाऱ्यांच्या बाबतीत पोलिस प्रशासन करणार का हा खरा प्रश्न आहे. 

कोल्हापुर येथील बैठकीत हिंदुत्ववादी संघटनांनी प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य केले असल्याचे अशोक सोनोने यांनी म्हटले आहे. आंबेडकर यांचाही गौरी लंकेश करू अशी बातमी महाराष्ट्र शासनाकडे व पोलिस खात्याकडे असूनही अजूनही कोल्हापुर येथे जमलेल्या हिंदुत्ववादी संघटनांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे या हिंदुत्ववादी संघटनांना पोलिस प्रशासनाने अभय दिले का? असा प्रश्न अशोक सोनोने यांनी उपस्थित केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com