ashok singhal attack modi and rss about ram temple | Sarkarnama

सरसंघचालक भागवतांचे मुस्लिम प्रेम खूपच उसळून आले, तोगडीयांनी तोफ डागली 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रा. स्व. संघावर प्रभाव असल्याचा आरोप करून राममंदिर निर्माण न होण्यासाठी संघाची कचखाऊ भूमिका जबाबदार आहे. गेल्या काही दिवसापासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मुस्लिम प्रेम खूपच उसळून आल्याचा आरोप हिंदुत्ववादी नेते डॉ.प्रवीण तोगडीया यांनी केला. 

विश्व हिंदू परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. तोगडीया आज पहिल्यांदाच नागपुरात आले. नागपुरात आल्यानंतर रेशीमबागेत जाणार्या तोगडीया यांनी तेथे न जाता रेशीमबागेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मोदी यांच्यासह सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर राम मंदिर निर्माणासाठी कशाचा अडसर आहे, असा सवाल करून डॉ. तोगडीया म्हणाले, संघाच्या बैठकीत आपण हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी आपल्याला या मुद्यावर पुढे जाऊ नका, असा सल्ला संघाच्या वरिष्ठांनी दिला होता. या बैठकीत संघाच्या पदाधिकार्यांवर मोदींचा दबाव थेटपणे जाणवत होता. 

गेल्या काही वर्षांपासून मोदींच्या कलाने संघ निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. भागवत यांचे मुस्लिम प्रेम खूपच उसळून आल्याचा टोलाही डॉ. तोगडीया यांनी हाणला. येत्या 20 ऑक्‍टोबरपासून राममंदिराच्या निर्माणासाठी लखनौवरून अयोध्येला कूच करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

संबंधित लेख