ashok gehlot and congress party | Sarkarnama

अहिंसा व प्रेमाचा संदेश देण्यासाठी सेवाग्राममध्ये कॉंग्रेसची बैठक - अशोक गहलोत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

नागपूर : सध्या देशात असहिष्णू व विद्वेषाचे वातावरण तयार झाले असताना यातून मार्ग काढण्यासाठी महात्मा गांधी यांचे प्रेम व अहिंसा या मूल्यांवर लोकांनी मार्गक्रमण करावे, हा संदेश देण्यासाठी सेवाग्राममध्ये कॉंग्रेस कार्य समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक सेवाग्राम येथे होत असल्याची माहिती अ. भा. कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रकारांना दिली. 

अशोक गहलोत व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आज सकाळी नागपूर येथे आगमन झाले. येथून ते सेवाग्रामला रवाना झाले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालची केंद्र सरकारने देशात एक भीतीचे वातावरण तयार केले आहे. देशात जातीय तसेच धार्मिक तेढ वाढली आहे. दलित व अल्पसंख्यांकावरील हल्ले वाढत आहे. यातून समाजात विद्वेषाचे वातावरण तयार झाले आहे. या स्थितीमध्ये लोकांना एक संदेश देण्यासाठी कॉंग्रेसच्या सर्वोच्च निर्णय समितीची बैठक सेवाग्राम येथे घेण्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे. या बैठकीत विद्वेषाच्या विरोधात ठराव संमत करण्यात येईल. 

सेवाग्राम ठरावासाठी एक विशेष समिती स्थापन झाली आहे. ही समिती सेवाग्रामध्ये संमत होणाऱ्या ठरावाला अंतिम रुप देत असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर अहिंसा व प्रेम या मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले. ही मूल्यांवर आता जोरदारपणे आघात सुरू झाले आहेत. या मूल्यांवर विश्‍वास व्यक्त करण्यासाठी सेवाग्रामची निवड केल्याचे गहलोत यांनी सांगितले. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला गहलोत यांनी दुजोरा दिला. 

संबंधित लेख