ashok chvan declares jaykumar gore ticket | Sarkarnama

अशोक चव्हाणांनी म्हसवडची गर्दी बघितली अन लगेच गोरेंची उमेदवारी जाहीर केली! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

अशोक चव्हाण म्हणाले, येत्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणारच आहे. त्यामुळे माण-खटावमधून जयकुमार गोरेच आघाडीचे उमेदवार असतील. आघाडी झाली नाही तरीही गोरेच उमेदवार राहतील, यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

म्हसवड (सातारा) : आगामी निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होणार आहे. आघाडी झाली तर माणमधून जयकुमार गोरेच उमेदवार आघाडीचे उमेदवार असतील. आघाडी झाली नाही तरी कॉंग्रेसचे तेच उमेदवार असतील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कॉंग्रसेच्या जनसंघर्ष यात्रेचे काल (सोमवार) रात्री म्हसवड येथे स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, आमदार अमरजीत काळे, आमदार जयकुमार गोरे, आमदार विश्वजीत कदम, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अशोक चव्हाण म्हणाले, इव्हीएम मशीनच्या जीवावर सत्ता आणणाऱ्या भाजपने बॅलेट पेपवर (मतपत्रिकेवर) निवडणुकांना सामोरे जावून विजय मिळवून दाखवावा. विविध पातळ्यांवर भाजप अयशस्वी ठरले असून सामान्य जनतेत असंतोष पसरला आहे. त्या सामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच आमची जनसंघर्ष यात्रा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  
 

संबंधित लेख