Ashok chavhan says BJP is cheating and giving false figures | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरुच - खा. अशोक चव्हाण

सरकारनामा न्यूज ब्यूरो
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई   :" मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही भाजचा दारूण पराभव झाला आहे. पण वस्तुस्थिती लपवण्यासाठी भाजपकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे. दुस-या टप्प्याच्या निकालाची सविस्तर आणि खरी आकडेवारी आम्ही लवकरच जाहीर करू असे सांगतानाच लोकांनी भाजपला दणका दिल्याने भाजपची फेकाफेकी सुरु आहे," अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, " आज निकाल जाहीर झालेल्या बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या 1063 आणि दुसऱ्या टप्पा मिळून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून खोटी आकडेवारी जाहीर  करून आपलाचं पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा भाजपने या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे.

भाजपाकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपने अमरावती जिल्ह्यात 150 ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपने फक्त 36 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे तर काँग्रेस पक्षाने 140 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे.

आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 52 पैकी 27, अमरावती जिल्ह्यात 249 पैकी 140, सांगली जिल्ह्यातील 452 पैकी 139, पुणे जिल्ह्यातील 221 पैकी 77 ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला. 

 " दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले.  पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण सरकारचे अपयश लपविण्यासाठी खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरु आहे," असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

संबंधित लेख