ashok chavhan about vilas patil undalkar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

उंडाळकर ज्येष्ठ नेते, मात्र त्यांचा निर्णय पृथ्वीराजबाबा घेतील आणि तो मान्य असेल! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

कऱ्हाड (सातारा) : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करुन कॉंग्रेस पक्षाबाहेर गेलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली आहे. 

कऱ्हाड (सातारा) : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करुन कॉंग्रेस पक्षाबाहेर गेलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली आहे. 

कऱ्हाडात पत्रकारांशी बोलताना उंडाळकर यांच्या घरवापसीच्या प्रश्‍नावर चव्हाण म्हणाले, विलासकाका आमचे जेष्ठ नेते आहेत. आजही त्यांच्याशी संबंध चांगले आहेत. त्यांच्यामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये कॉंग्रेसला बळकटीसाठी ज्या गोष्टी घडतील त्या व्हाव्यात, या मताचा मी आहे. पक्षाच्या बळकटीसाठी कधीही मागे पुढे पाहत नसल्याचे सांगून श्री. उंडाळकर यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण योग्य तो निर्णय घेतील. त्यांचा निर्णय मान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले. 
 
संबंधित लेख