महेश मांजरेकरांबरोबर एकत्र फक्त नाष्टा झाला : अशोक चव्हाण
कऱ्हाड (सातारा) : चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्याबरोबर कोल्हापुरात फक्त नाष्टा झाला. त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.
महेश मांजरेकर यांच्या कॉंग्रेसप्रवेशाच्या चर्चेबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, श्री. मांजरेकर माझे मित्र आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत एकत्र नाष्टा झाला. तेथे कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र होण्याच्या शक्यतेबाबत ते म्हणाले, निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूका होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होत चालल्याची भाजपला भिती आहे. त्यामुळे सध्याची लोकप्रियता कॅश करण्यासाठी निवडणूक एकत्र घ्यावी असाही विचार येत असल्याचे दिसते. मात्र निवडणूका केव्हाही घेतल्या तरी आमची तयारी आहे.