Ashok Chavan Says Tukaram Mundhe is a Good Administrator | Sarkarnama

तुकाराम मुंढे उत्तम प्रशासक, मात्र समन्वयात कमी : अशोक चव्हाण

संपत देवगिरे 
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे प्रामाणिक, उत्तम प्रशासक आणि चांगले काम करणारे अधिकारी आहेत. फक्त ते लोकप्रतिनिधींशी समन्वयात कमी पडतात. मात्र त्यांच्या कामकाजावर कोणीही शंका घेऊ शकत नाही - अशोक चव्हाण

नाशिक : ''महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे प्रामाणिक, उत्तम प्रशासक आणि चांगले काम करणारे अधिकारी आहेत. फक्त ते लोकप्रतिनिधींशी समन्वयात कमी पडतात. मात्र त्यांच्या कामकाजावर कोणीही शंका घेऊ शकत नाही,'' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.  

मुंढे यांच्या बदलीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ''मुंढे चांगले अधिकारी आहेत. स्वच्छ प्रतिमेचे आहेत. त्यांनी जिल्हास्तरावर यापूर्वी विविध ठिकाणी चांगले काम केले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसमवेत समन्वयात ते कमी पडतात. लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना दुर्लक्षीत करुन चालत नाही. त्यामुळेच त्यांचे लोकप्रतिनिधींशी वाद होत राहतात. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्त केले. त्यांनीच त्यांची बदली केली." 

संबंधित लेख