Ashok Chavan & Prithviraj Chavan saved | Sarkarnama

... आणि पृथ्वीराज - अशोक चव्हाण  बचावले

अरुण जोशी 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

.

 अमरावती : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या विदर्भाच्या दौ-यावर आहे. अमरावती जिल्ह्यात आज, बुधवारी डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा बसचा अपघात टळला.

 या बसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रवास करीत होते. यासंदर्भातील माहितीनुसार काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची बस मोर्शीहून निघाली होती. 

त्यानंतर ही बस खानापूरमध्ये दोनदा थांबली. ही बस खानापूरहून निघताच गावच्या वेशीवर एक डंपर समोर आला. रस्त्याचं काम सुरू असल्यानं या ठिकाणी अतिशय अरुंद भागातून वाहतूक सुरू होती. या रस्त्यावरुन एकाचवेळी बस आणि डंपर जाऊ शकत नाहीत, हे लक्षात येताच डंपर चालकानं प्रसंगावधान राखलं. त्यानं डंपर डाव्या बाजूला घेतला. त्यामुळे बस आणि डंपरची समोरासमोर होणारी धडक टळली.

 बस चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. डंपर अचानक डाव्या बाजूला घेतल्यानं तो थोडासा कलंडला. मात्र उलटला नाही. या बसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक मोठे नेते प्रवास करत होते.

संबंधित लेख