ashok chavan, press | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

कॉंग्रेसला सरकसट कर्जमाफीच हवी : अशोक चव्हाण 

संदीप खांडगेपाटील 
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई : कर्जमाफीप्रकरणी राज्य सरकारची भूमिका दररोज बदलत आहे. आज एक भूमिका तर उद्या एक असा प्रकार सुरु असल्याने सरकार कर्जमाफीच्या भूमिकेवर ठाम भूमिका घेत नसल्याचे पहावयास मिळत आहे. सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया किचकट करून ठेवले असून दररोज निकष बदलत आहेत. अटी घातल्या जात आहेत. आज आदेश काढायचा, उद्या बदलायचा असा तुघलकी कारभार राज्य सरकारचा सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारनामाशी बोलताना केली. 

कर्जमाफी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी भावनिक व संवेदनशील विषय झाला असून राज्य सरकार आजही कर्जमाफीच्या नावाखाली आकड्यांचा खेळ खेळत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारची दररोज भूमिका बदलत आहे. राज्यातील शेतकऱ्यांकरिता सरसकट कर्जमाफी हाच कॉंग्रेससाठी महत्वाचा विषय असून लवकरच सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून आगामी आंदोलनाची दिशा निश्‍चित करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

राज्यात सलग चार वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी निसर्गाशी लढल्याने त्याचे कंबरडे मोडले असून तो उध्दवस्त झाला आहे. त्याने भरारी घेण्यासाठी त्याला मदतीची गरज असताना राज्य सरकार कर्जमाफीप्रकरणी आकडेवारीच्या खेळात व्यस्त असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. 

सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना आज हवी आहे. दीड लाख, दोन लाख, अडीच लाख असे न करता सरसकट कर्जमाफीच कॉंग्रेससाठी महत्वाची असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  
 
संबंधित लेख