Ashok Chavan Opponents silent in Vidarbha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विदर्भातील विरोधक गारद?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 डिसेंबर 2018

जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून मात्र चव्हाण विरोधक गारद झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विदर्भातील अनेक नेत्यांनी विरोध केला होता. त्यांच्या विरोधात दिल्लीपर्यंत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती. 

नागपूर : जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून मात्र चव्हाण विरोधक गारद झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विदर्भातील अनेक नेत्यांनी विरोध केला होता. त्यांच्या विरोधात दिल्लीपर्यंत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती. 

माणिकराव ठाकरे यांच्याजागी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून विदर्भातील काही नेते त्यांचा विरोध करीत होते. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश असताना या विरोधी मोहिमेला चांगलेच बळ मिळाले होते. नागपुरातील नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार गेव्ह आवारी, यवतमाळ येथील माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, चंद्रपूर येथील माजी खासदार नरेश पुगलिया, नागपुरातील आमदार सुनील केदार आदी दिग्गज अशोक चव्हाण हटाव मोहिमेत आघाडीवर होते. 

मोहन प्रकाश यांची उचलबांगडी झाल्यानंतर मल्लिाकार्जुन खरगे यांची नियुक्ती राज्याचे प्रभारी म्हणून झाली. यावेळी काही नेत्यांनी अशोक चव्हाण यांना हटविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले. परंतू, अशोक चव्हाण यांनी विदर्भातील संघटन मजबूत करण्यावर भर दिला. नागपूर येथे दोन वर्षांपूर्वी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढला होता.त्याचप्रमाणे चंद्रपूर येथे जनआक्रोश सभा यशस्वीपणे केली. एवढेच नव्हे तर चंद्रपूर येथील नांदेड या छोट्या गावात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा यशस्वी करून दाखविल्याने विरोधकांचे अवसान गळू लागले होते. 

यवतमाळ जिल्ह्यातील चव्हाण विरोधक शिवाजीराव मोघे व पुरके चव्हाण विरोधाला विराम देऊन अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनसंघर्ष यात्रेत सामील झाले व त्यांच्यासमोर राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा अनेक काँग्रेस नेत्यांनी केली. या जनसंघर्ष यात्रेमुळे विदर्भातील चव्हाण विरोधक गारद झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

संबंधित लेख