ashok chavan is not advocate prakash ambedkar | Sarkarnama

अशोक चव्हाण यांना माझे वकीलपत्र दिले नाही ः प्रकाश आंबेडकर 

श्रीकांत पाचकवडे 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

अकोला ः "एमआयएम'सोबत युती करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा वंचीत बहुजन आघाडीचा प्रमुख म्हणून माझा आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केवळ त्यांच्या पक्षापुरतेच बोलावे. त्यांना मी माझे वकीलपत्र दिलेले नाही असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याचा गुंता वाढला आहे. × आंबेडकर हे लवकरच "एमआयएम' सोबत असलेली युती तोडून कॉंग्रेस आघाडीत सहभागी होणार असल्याचे चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. 

चव्हाण यांच्या या वक्तव्याचा आंबेडकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, की कॉंग्रेसला लोकसभेच्या 12 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र, त्यावर कॉंग्रेस नेत्यांकडून कोणतीच समाधानकारक बोलणी झाली नाही. त्यांना "एमआयएम' चालत नसेल तर आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस कशी चालणार ? असे सवाल त्यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा भाजपचा पाठिराखा राहिला आहे. राष्ट्रवादीच्याच पाठबळावर राज्यात भाजपची सत्ता आली असल्याचे आंबेडकर म्हणाले. माळी, धनगर, मुस्लीम, ओबीसीसह वंचीत समाजाची मोठी ताकद वंचित बहुजन आघाडीच्या पाठिशी उभी राहिली असून "एमआयएम'शी युती करून आम्ही राज्यभर मोर्चेबांधणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख