महाराष्ट्रातल्या एटीएममध्ये खडखडाट तर कर्नाटकात 2 हजारच्या नोटांचा सुकाळ - चव्हाण

 महाराष्ट्रातल्या एटीएममध्ये खडखडाट तर कर्नाटकात 2 हजारच्या नोटांचा सुकाळ - चव्हाण

नांदेड : महाराष्ट्रात सर्वच एटीएम मध्ये सध्या खडखडाट असून नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. नोटाबंदीतून भाजपने काय साध्य केले ? त्याचबरोबर सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू असून तिथे मात्र दोन हजाराच्या नोटांचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे भाजपवर शंका व्यक्त होत असून आता जनतेने त्यातून बोध घ्यावा, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केले. 

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाडा स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबिर तसेच जाहीर सभा नांदेडला आयोजित केली आहे. त्यानिमित्त दुपारच्या सत्रात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार कुमार केतकर, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी प्रास्ताविक केले तर माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, आमदार अमिता चव्हाण, महापौर शीला भवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर आदींनी स्वागत केले. 

खासदार चव्हाण म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने अस्थिर परिस्थिती केली असून कामगारापासून ते व्यापारी, बेरोजगार, शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण अडचणीत आले आहेत. खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. अल्पसंख्याक आणि दलितांवर हल्ले व अत्याचार होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. मुख्यमंत्री व पंतप्रधान त्यावर काहीच भाष्य करत नाहीत तर भाजपचे पदाधिकारी समर्थन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार कुमार केतकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनीही शिबिरात मार्गदर्शन केले. आमच्या सरकारमधील योजना बंद करण्याचा तसेच आमच्या चांगल्या योजनांची नावे बदलून त्याच योजना सुरु करण्याचा घाट भाजप सरकारने घातला असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

खासदार केतकर म्हणाले की, जगाच्या पातळीवर भारत - पाकिस्तान असा वाद करून तर देशात हिंदू - मुस्लिम असा वाद करून भाजप सर्वांचीच फसवणुक करत आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला एक वर्षभर सावध रहावे लागणार आहे. दहशतवाद निर्माण करून मोदी आणि भाजप सरकार परत सत्ता मिळवू पाहत आहे. त्यामुळे आत्तापासूनच त्यांचा डाव ओळखून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com