ashok chavan interview | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

ईशान्येतील निवडणुकांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही : अशोक चव्हाण 

तुषार खरात 
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय व नागालॅंड येथे कॉंग्रेसला अपयश आले आहे. परंतु त्याचा कोणताही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार नाही. भाजप व शिवसेनेच्या सरकारवर राज्यातील जनता नाराज आहे. त्यामुळे अन्य राज्यातील निवडणुकांच्या यशाचा राज्यात भाजपला सकारात्मक फायदा होणार नाही, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी "सरकारनामा"शी बोलताना व्यक्त केले. 

शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, धनगर - मराठा - मुस्लीम यांचे रखडलेले आरक्षण, जीएसटी, बेरोजगारी, बोंडअळीच्या नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळत नाही अशा विविध मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनता कमालीची नाराज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कॉंग्रेसच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांत प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. या शिबिरांतून आम्ही सरकारविरोधातील मुद्द्यांबाबत कार्यकर्त्यांना माहिती देत आहोत. कार्यकर्त्यांकडून स्थानिक प्रश्न समजून घेत आहोत. त्यांच्याशी सुसंवाद साधत आहोत. पक्षाची यंत्रणा अतिजोमाने कामाला लागली पाहीजे यासाठी शिबिरातून प्रयत्न केला जात असल्याचे चव्हाण म्हणाले. 

संबंधित लेख