ashok chavan birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

पिता आणि पुत्र अशा दोघांनीही राज्याचे सर्वोच्च असलेले मुख्यमंत्रीपद भूषविले. ते म्हणजे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै) शंकरराव चव्हाण आणि कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण. राज्याच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये अशोकरावांचे यांचे नाव असून शंकरराव चव्हाण यांच्या विकासात्मक कार्यकर्तृत्वाचा आणि कार्यशैलीचा पायंडा यशस्वीपणे पुढे नेण्याचे काम ते करत आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताना त्यांनी स्वतःचे विकासात्मक नेतृत्वही यशस्वीरित्या सिद्ध केले आहे. 

राजकीय वारसा, विचारांची प्रगल्भता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यावर विश्वास असलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यमंत्रिपदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रदीर्घ अनुभव तसेच कॉंग्रेस पक्षामध्ये युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस ते प्रदेशाध्यक्ष असा संघटनात्मक कामकाजाचा अनुभव असल्यामुळेच राज्याच्या प्रभावशाली नेतृत्वामध्ये त्यांचा समावेश आहे. रविवारी ता. 28 ऑक्‍टोंबर रोजी 61 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. सध्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त ते महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सरकारविरोधात भूमिका मांडण्याचे काम करत आहेत. 

संबंधित लेख