Ashok Chavan attacks Fadanvis - Modi | Sarkarnama

 कल्याण-डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी कधी देता ? : अशोक चव्हाण 

सरकारनामा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई : विकासाच्या खोट्या वल्गना करण्याआधी कल्याण डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी रुपये कधी देणार? ते सांगा, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे . 

भाजपवर तोफ डागताना अशोक चव्हाण म्हणाले ," शिर्डीमध्ये साईबाबांच्या समोर येऊन देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलले होते. तीच परंपरा कल्याण येथे देखील धादांत खोटे बोलून पंतप्रधानांनी सुरू ठेवली आहे. गेले चार वर्ष जुमलेबाजी व अतिरंजित आकडे दर्शवून खोट्या विकासाच्या वल्गना करणे ह्यापेक्षा अधिक मोदी तसेच राज्यातील फडणवीस सरकारने काहीही केलेले नाही."

 " धादांत खोटं बोलून अवास्तव घोषणांचा पाऊस पाडायचा ही कार्यपद्धती पंतप्रधानांनी कल्याण येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ही सुरू ठेवली आहे. निवडणूका केवळ काही महिनेच दूर असल्याने या जुमलेबाजीचा अंत जवळ आला असून नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने भाजपच्या जुमलेबाजीचा जसा अंत केला तसाच अंत महाराष्ट्राची जनता करेल," असा विश्वास खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला .

संबंधित लेख