ashok chavan attack bjp | Sarkarnama

भाजपला उतरती कळा, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

नांदेड : देशात भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

कर्नाटकात झालेल्या लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला त्या पार्श्वभूमीवर चव्हाण सामशी बोलत होते. ते म्हणाले, की राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगडसह पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट होईल. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. 

अवनीप्रकरणाची चौकशी करा 
अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावरुन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करताना चव्हाण म्हणाले, की स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तशी मागणी केली. मनेका गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केलीय त्यामुळे चौकशी झाली पाहिजे वाघीण मृत्यू प्रकरण शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही उचलल्याने या प्रकरणाची गांभिर्यता वाढली आहे.  
 
संबंधित लेख