ashok chavan | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या दानवेंना त्यांची "पदवी' परत केली - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मे 2017

नांदेड : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना जी पदवी दिली ती आम्ही मालेगावच्या जाहीर सभेत त्यांना साभार परत केली असल्याचे सांगून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सरकार नसून सावकार असल्याची टीकाही केली. त्याचबरोबर हे सरकार गरीबांना लुटण्याचे काम करत असून एमआयएम, समाजवादी पक्ष हे भाजपची "बी' टीम असल्याचा आरोप त्यांनी केला. 

खासदार चव्हाण हे नांदेडला आले असून त्यापूर्वी त्यांनी मालेगाव महापालिका निवडणुकीच्या कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. त्यावेळी त्यांनी हिंदी आणि उर्दूतून भाषण करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टिका केली. काही दिवसापूर्वी श्री. दानवे यांनी तूर खरेदी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना "साले' हा शब्द वापरला होता. त्यावरून राज्यात विरोधकांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील त्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला होता.

मालेगावच्या भाषणात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी देखील समाचार घेतला. याबाबत "सरकारनामा'शी सोमवारी बोलताना ते म्हणाले की, श्री. दानवे यांच्या वक्तव्याचा यापूर्वीच मी आणि कॉंग्रेस पक्षाने निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्याबद्दल दानवे यांनी काढलेले उद्‌गार बरोबर नसून त्यांनी शेतकऱ्यांना जी पदवी दिली तीच पदवी त्यांना साभार परत केली आहे. शेतकऱ्यांबद्दल दानवे जे बोलले ते वक्तव्य बरोबर नव्हते, हे सांगण्याचाच माझा उद्देश होता. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आमि शेतकऱ्यांबद्दल नव्हे तर खासदार दानवेंच्या बद्दल मी मालेगावातील सभेत बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार हे सरकार नसून सावकार आहे. एमआयएम, समाजवादी पक्ष हे भाजपची "बी' टीम असून भाजपला मदत करण्यासाठीच हे पक्ष निवडणुकीत उतरले आहेत. मात्र असे असले तरी भाजपला रोखण्याची ताकद फक्त कॉंग्रेसमध्ये आहे आणि त्याची सुरुवात मालेगावमधून होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

संबंधित लेख