ashishtosh target kejriwal | Sarkarnama

 "आप'ने मला आडनाव वापरण्यास भाग पाडले, आशुतोष यांची खंत 

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली  : आम आदमी पक्षाला (आप) सोडचिठ्ठी देणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि संपादक आशुतोष यांनी आज ट्‌विटरवरून पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला. 

नवी दिल्ली  : आम आदमी पक्षाला (आप) सोडचिठ्ठी देणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि संपादक आशुतोष यांनी आज ट्‌विटरवरून पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला. 

"आपकडून मागील लोकसभा निवडणूक लढविताना जाणीवपूर्वक आडनाव वापरण्यास भाग पाडण्यात आले होते, प्रत्यक्षात आपण कधीही ते वापरत नव्हतो. हे करण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला होता,'' असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 
\
आशुतोष यांच्या ट्‌विटनंतर आज दिल्लीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान, "आप'च्या लोकसभेसाठीच्या संभाव्य उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आतिशी मार्लेना या ख्रिश्‍चन असल्याने त्यांनाही जाणीवपूर्वक आडनाव वगळण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आशुतोष यांनी केलेले ट्‌विट चर्चेचा विषय ठरले आहे. 

संबंधित लेख