ashish shelar | Sarkarnama

भाजप-शिवसेनेचे सिडको, म्हाडासाठी जोरदार लॉबिंग

संदीप खांडगेपाटील: सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई : सिडको व म्हाडासाठी शिवसेनेने देव पाण्यात ठेवले असले तरी शिवसेनेला सिडको व म्हाडा महामंडळे न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिडकोच्या चाव्या उत्तर महाराष्ट्राकडे तर म्हाडाच्या चाव्या आशिष शेलारांकडे सोपविणार असल्याची जोरदार चर्चा सत्ताधारी वर्तुळात सुरू झाली आहे. 

मुंबई : सिडको व म्हाडासाठी शिवसेनेने देव पाण्यात ठेवले असले तरी शिवसेनेला सिडको व म्हाडा महामंडळे न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिडकोच्या चाव्या उत्तर महाराष्ट्राकडे तर म्हाडाच्या चाव्या आशिष शेलारांकडे सोपविणार असल्याची जोरदार चर्चा सत्ताधारी वर्तुळात सुरू झाली आहे. 

मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे भाजपाच्या अनेक आमदारांमध्ये गेल्या अडीच वर्षापासून नाराजी आहे. सत्ता येऊनही महामंडळावर वर्णी लागत नसल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पक्षीय स्तरावर नाराजीचा सूर वारंवार आळविला जात आहे. सत्तेतील भागीदार असलेला शिवसेना पक्ष महामंडळासाठी आग्रही असला तरी म्हाडा व सिडकोसारख्या महामंडळामध्ये शिवसेनेला शिरकावही करू न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला असल्याचे समजते. शिवसेना भाजपाला क्रमांक एकच शत्रू मानत असल्याने म्हाडा व सिडको या महामंडळाचा वापर शिवसेना भाजपाविरोधासाठीच करणार असल्याचे गृहीत धरून या महामंडळापासून शिवसेनेला चार हात लांबच ठेवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. 

मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरणसह अन्य भागातील भाजपामधील मातब्बर मंडळी सिडकोसाठी मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असली तरी भाजपाने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सिडकोच्या अध्यक्षपदी व संचालकपदी शहरी भागातील भाजपेयींना स्थान मिळणार नसल्याचे निश्‍चित मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको महामंडळावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या घटकांना निश्‍चित केले असल्याची माहिती भाजपा सूत्रांकडून देण्यात येत आहे. 

मुंबई प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांचे सत्ता येऊन अडीच वर्षाचा कालावधी उलटल्यावरही कोठेही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. भाजपाकडून शिवसेनेला सातत्याने अंगावर घेणाऱ्या नेत्यांमध्ये आशिष शेलार आघाडीवर आहेत. मुंबई महापालिकेत भाजपाने मारलेल्या मुसंडीचे श्रेय भाजपा वर्तुळामध्ये आशिष शेलारांनाच देण्यात येत आहे. त्यातच शेलार यांनी मंत्रिपद न मागता कोकण विभागात भाजपा मजबूत करण्यासाठीची जबाबदारी मागितल्याने संघ परिवाराच्या गुड बुक मध्येही शेलारांनी आघाडी घेतली आहे. 

म्हाडासारख्या महामंडळावर शेलारांची वर्णी लावून त्यांच्या संघटनात्मक कामाची त्यांना भाजपाकडून बक्षिसी देवून पाठ थोपटली जाणार आहे. शेलारांची म्हाडावर वर्णी लावून प्रकाश मेहतांवर अकुंश आणण्याची भाजपाची व संघ परिवाराची ही चाल असल्याचे भाजपा परिवारात बोलले जात आहे. 

म्हाडा व सिडकोसारख्या महामंडळावर शिवसेनेची वर्णी न लावता अन्य दुय्यम महामंडळावर शिवसेना व भाजपाच्या अन्य मित्र पक्षांना समाधान मानावे लागणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. 

संबंधित लेख