Ashish deshmukh to fight against Nitin Gadkari | Sarkarnama

भाजपमधून बाहेर पडलेले आशिष देशमुख गडकरीं विरोधात लढणार ?

सरकारनामा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

भाजपमधून बाहेर पडताच आशीष देशमुख यांनी आपण भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले .

मुंबई : भाजपमधून बाहेर पडताच आशीष देशमुख यांनी आपण भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले .

आज विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर ते बोलत होते . 

त्यांचे वडिल रणजित देशमुख यांनी नागपूर पश्‍चिम मधून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. चिरंजीवांनी मात्र  मात्र फडणवीस यांच्याऐवजी गडकरी यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे.   

 आशीष देशमुख यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरीभाउ बागडे यांना राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आणखी काही आमदार भाजपतून बाहेप पडण्याच्या विचारात असल्याचे जाहीर केले आहे . मात्र कोण बाहेर पडणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही . 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोदी लाट दिसू लागताच अनेक नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केलेला होता . पण ना मंत्रिपद मिळाले ना महामंडळ ! त्यामुळे काही जण नाराज आहेत .

त्यापेक्षांही महत्वाचे म्हणजे मोदींची लाट आता ओसरू लागली असल्याने निवडून यायचे तर बाहेर पडावे असे काहींना वाटत आहे . आशिष देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकून अजून काही नेते स्वगृही परत निघतात की लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून निर्णय घेतात हे लवकरच कळणार आहे . 

संबंधित लेख