Ashadhi Vitthal Mahapooja | Sarkarnama

आषाढी एकादशी महापूजेचा मान अनिल व वर्षा जाधव यांना 

भारत नागणे
सोमवार, 23 जुलै 2018

दरवर्षी आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. यावर्षी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चा आणि धनगर आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आषाढीची शासकीय महापूजा कऱण्यास विरोध केला होता. वाढत्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या आषाढीच्या महापूजेस येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर यंदाची आषाढीची महापूजा कोणाच्या हस्ते होणार याकडे लक्ष लागले होते.

पंढरपूर : महाराष्ट्राचे लोक दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती गावच्या  अनिल गंगाधर जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा यांना मिळाला. 

दरवर्षी आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. यावर्षी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चा आणि धनगर आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आषाढीची शासकीय महापूजा कऱण्यास विरोध केला होता. वाढत्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या आषाढीच्या महापूजेस येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर यंदाची आषाढीची महापूजा कोणाच्या हस्ते होणार याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री उशिरा विठ्ठलाची महापूजा वारकऱ्याच्या हस्ते होईल असे स्पष्ट केले. त्यानुसार दर्शन रांगेत उभे असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील अनिल व वर्षा जाधव या शेतकरी  दाम्पत्याला श्री विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. जाधव दाम्पत्य हे चार वर्षापासून आषाढीची पायी वारी करतात. शेतकरी कुटुंब असलेले अनिल जाधव यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे.

रात्री साडे आकरा वाजता पूजेसाठी मंदिर बंद करण्यात आले. त्यावेळी रांगेतील पहिले असलेल्या  अनिल जाधव व  वर्षा जाधव या  दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला.  पहाटे आडीच वाजणेच्या सुमारास जाधव दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली. यावेळी  पालकमंत्री  विजयकुमार देशमुख,  विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ.अतुल भोसले, सहअध्यक्ष  आैसेकर महाराज, समितीचे सदस्य संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होेते.

दहा लाख भाविक दाखल
आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी राज्यासह विविध राज्यातून सुमारे 10 लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासूनच चंद्रभागास्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चंद्रभागातिर विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत सुमारे तीन लाख भाविक आहेत. मुखदर्शनासाठी मोठी रांग लागली आहे. 

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील मठ,धर्मशाळा, आणि मंदिरामध्ये हरीनामाचा जगर सुरु आहे. भक्तीमय वातावरणाने व हरीनामाच्या जयघोषाने पंढरीनगरी नाहून निघाली आहे. पहाटेपासून दिंड्यांनी नगरप्रदर्शना सुरु केल्याने  सर्वरस्ते भगवेमय झाले आहेत.

संबंधित लेख