asha buchake challenges sonawane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

दम असेल तर समोर या आणि पुरावे द्या : आशा बुचकेंचे आमदार सोनवणेंना आव्हान

रवींद्र पाटे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात विकासकामांचा श्रेयवाद पेटला आहे. यावरुन आमदार शरद सोनवणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली आहे. न केलेल्या विकासकामांबाबत सोशल मिडियात  चुकीची माहीती देऊन आमदार सोनवणे हे जनतेची फसवणूक करत असल्याच आरोप पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशाब बुचके यांनी दिला.

बुचके या एवढ्यावर न थांबता, `दम असेल तर समोर या. तुमचे पुरावे दाखवा. खासदारांच्या विकासकामाचे श्रेय  लाटण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात विकासकामांचा श्रेयवाद पेटला आहे. यावरुन आमदार शरद सोनवणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली आहे. न केलेल्या विकासकामांबाबत सोशल मिडियात  चुकीची माहीती देऊन आमदार सोनवणे हे जनतेची फसवणूक करत असल्याच आरोप पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशाब बुचके यांनी दिला.

बुचके या एवढ्यावर न थांबता, `दम असेल तर समोर या. तुमचे पुरावे दाखवा. खासदारांच्या विकासकामाचे श्रेय  लाटण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सोनवणे यांच्या प्रयत्नामुळेच जुन्नर न्यायालय इमारत बांधकामाला निधी मंजूर झाला असल्याचा प्रचार सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरू आहे. याबाबत माहीती देण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी(ता.10) रात्री येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बुचके यांनी आमदार सोनवणे यांचा समाचार घेतला. या वेळी विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे उपस्थित होते.

बुचके म्हणाल्या ``अष्टविनायक रस्ता जोड प्रकल्प, जुन्नर न्यायालय इमारत बांधकाम, दाऱ्या घाट सर्व्हे, बेल्हा ते जेजुरी रस्ता या विकासकामांना खासदार आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच मंजुरी मिळाली आहे. दाऱ्या घाटासाठी खासदार आढळराव पाटील सन 2007 पासून प्रयत्न करत आहेत. त्या वेळी आमदार सोनवणे हे तालुक्‍यात सुद्धा नव्हते. केवळ एक पत्र पाठवून मंजुरी मिळाली असती तर तालुक्याचा खूप विकास झाला असता. खासदारांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा खोटा खटाटोप आमदार सोनवणे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत." धमक असेल तर विकास कामाचे पुरावे घेऊन समोर या'असे आवाहन या वेळी बुचके यांनी केले.

खंडागळे म्हणाले न्यायालयीन कामासाठी जानेवारी महिन्यात खासदार आढळराव पाटील, गजानन कीर्तिकर जुन्नर येथे आले होते.या वेळी बार असोसिएशनच्या वतीने जुन्नर न्यायालय इमारत दुरवस्थेचा प्रश्‍न उपस्थित केला होता. खासदारांनी 16 फेब्रुवारी 2018 नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री फडणवीस,राज्यमंत्री पाटील यांनी 4 जुलै 2018 रोजी खासदार आढळराव पाटील यांना जुन्नर न्यायालय इमारत बांधकामासाठी 13 कोटी 70 लाख रुपये मंजुरीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्राने कळवले होते. याबाबतची माहीती मिळाल्या नंतर आमदार सोनवणे यांनी 18 जुलै 2018 रोजी राज्यमंत्री पाटील यांना पत्र दिले. ही वस्तुस्थिती असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार सरसावले आहेत .न्यायालय इमारत बांधकाम, अष्टविनायक रस्ता जोड प्रकल्प, दाऱ्या घाट सर्व्हे मंजुरीशी आमदार सोनवणे यांचा कोणताही सबंध नाही. किल्ले शिवनेरी परिसर विकासाला सोनवणे आमदार नसताना मंजुरी मिळाली आहे.

संबंधित लेख