आता आसावरी जोशीही काँग्रेसमध्ये जाणार

अभिनेत्री नगमा, शिल्पा शिंदे यांच्या नंतर आता अभिनेत्री आसावरी जोशी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. आज दुपारी संजय निरूपम यांच्या उपस्थितीत मुंबईत त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. दोन आठवड्यांपूर्वी टीव्ही कलाकार शिल्पा शिंदे हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
आता आसावरी जोशीही काँग्रेसमध्ये जाणार

मुंबई : अभिनेत्री नगमा, शिल्पा शिंदे यांच्या नंतर आता अभिनेत्री आसावरी जोशी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.  आज दुपारी संजय निरूपम यांच्या उपस्थितीत मुंबईत त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. दोन आठवड्यांपूर्वी  टीव्ही कलाकार शिल्पा शिंदे हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

दरम्यान, काँग्रेस आपले उमेदवार अंतिम करण्याच्या मार्गावर असून दिल्लीत 25 फेब्रुवारी पासून स्क्रिनिंग कमिटी ची बैठक होणार आहे. त्याआधी महाराष्ट्रातील उमेदवारांची नाव अंतिम करण्याचे काम सुरु आहे. काँग्रेस लढवत असलेल्या जागांवर नाव निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील पाच जागांवर खलबते सुरु आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, तर गुरुदास कामात यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम यांचे नाव समोर येत आहे. याच जागेवर कृपाशंकर सिंग, नसीम खान ही इच्छूक होते. निरुपम यांच्या विरोधात दिल्लीपर्यंत तक्रार करण्यात आली आहे. परंतु, या जागेवर निरुपम यांच्याच नावाला प्राधान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावाला पसंती आहे. प्रिया दत्त यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अजूनही काँग्रेस त्यांना त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी देखील प्रिया दत्त यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर हे इच्छुक आहेत

संजय निरुपम यांच्या विरोधात नाराजी असल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईच्या उमेदवारांची यादी केली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम देखील मुंबईतील जागांची आपली यादी बनवणार आहेत. वाद टाळण्यासाठी दोन्ही याद्या दिल्लीतील स्क्रीनिग कमिटी कडे पाठवण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com