asauddin owaissy about balasaheb | Sarkarnama

महाराष्ट्राचे मुस्लीम प्रकाश आंबेडकरांना डोक्‍यावर घेतील : ओवैसी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

बाबासाहेब आंबेडकरांना बंगालच्या मुस्लीमांनी डोक्‍यावर घेतले होते.

पुणे : बाबासाहेब आंबेडकरांना बंगालच्या मुस्लीमांनी डोक्‍यावर घेतले होते. त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रातील मुस्लीम डोक्‍यावर घेतील, असा विश्‍वास एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्‍त केला.

औरंगबाद येथील वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या संयुक्‍त सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या पाठिमागे एमआयएम महाराष्ट्रात ताकदीने उभी राहील. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत जावू दिले जात नव्हते. त्यावेळी बंगालच्या मुस्लीमांनी त्यांना डोक्‍यावर घेतले आणि निवडून पाठवले. तसेच आता प्रकाश आंबेडकरांना येथील मुस्लीम संसदेत पाठवतील.याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

या सभेला आमदार इम्तीयाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते. 

संबंधित लेख