Asamees Delgation Meets Raj Thakray | Sarkarnama

आसामधील बिहारी परप्रांतियांचा मुद्दा 'राजदरबारी'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 जुलै 2017

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज आसामच्या महिला शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण तिथल्या परप्रांतियांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.

मुंबई : आसाममध्ये परप्रांतीयांचे आक्रमण वाढत असून आसामी संस्कृती लोप पावत आहे. तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या भल्यासाठी एकही पक्ष किंवा संघटना काम करीत नाही. त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी आसाममध्ये या, अशी विनंती आसामी महिला संघटनांनी राज ठाकरे यांना निवेदन देऊन केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज आसामच्या महिला शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.

आसाममध्ये उत्तरप्रदेश, बिहारची माणसे काम करून आपली उपजिविका चालवतात. त्यामुळे आसामच्या संस्कृतीवर परिणाम होत आहे. या परप्रांतीयांची संख्या वाढतच आहे. आसामच्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे, असे गाऱ्हाणे या महिला संघटनांनी मांडले. त्यामुळे राज ठाकरे खरोखरच आसामला जाऊन याप्रकरणी तोडगा काढतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संबंधित लेख