arun lad appointed as ncp vice president | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

डाव्या विचारधारेतील अरुणअण्णा बनले राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष! 

संपत मोरे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांचे सुपूत्र आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आज निवड झाली. आज दुपारी प्रदेश कार्यालयातून लाड यांना फोनवरून तसे कळवण्यात आले. 

क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांचे सुपूत्र आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आज निवड झाली. आज दुपारी प्रदेश कार्यालयातून लाड यांना फोनवरून तसे कळवण्यात आले. 

अरुण लाड यांच्या साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा कार्यक्रम झाला होता. निमित्त होते लाड यांच्या वाढदिवसाचे. या कार्यक्रमांनंतर काही महिन्यातच ही निवड झाली आहे. 

अरुण लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती पण पक्षाने सारंग पाटील यांना उमेदवारी दिल्याने लाड यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला. पण लाड यांनी स्वतःची शक्ती पक्षाला दाखवून दिली. त्यानंतर काही दिवस ते पक्षावर नाराज होते. ही नाराजी नंतरच्या काळात दूर झाली. 

अरुण लाड यांची जडणघडण डाव्या विचारधारेत झाली आहे. त्यांचे वडील जी डी लाड हे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य. ते एक वेळा विधानसभेचे तर एक वेळा विधानपरिषद सदस्य होते. राज्यातील एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ख्याती होती. तोच अभ्यासू वारसा अरुण लाड यांनी सांभाळला आहे. त्यांनी शेतीच्या प्रश्नावर एक पुस्तक लिहिले आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या क्रांतीअग्रणी पर्व या ख्यातनाम साप्ताहिकाचे ते संपादक मंडळाचे अध्यक्ष आहेत.अनेक लेखकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या रूपाने एका अभ्यासू आणि लेखक नेत्याची निवड कार्यकारिणीत झाली आहे. 

संबंधित लेख