अरूण अडसड यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

अरूण अडसड यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई : माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषद सदस्यपदी अरुण जनार्दन अडसड यांची निवड झाली होती. विधानभवनातील सभापतींच्या दालनात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्री. अडसड यांना विधानपरिषद सदस्यपदाची शपथ दिली.

श्री. अडसड हे दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते. तसेच ते विदर्भ औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षही होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार सर्वश्री आकाश फुंडकर, भाई गिरकर, मनीषा चौधरी तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, अवर सचिव उमेश शिंदे, रवींद्र जगदाळे, बाबा वाघमारे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com