भाजपचे अरुण अडसड विधान परिषदेवर बिनविरोध 

भाजपचे अरुण अडसड विधान परिषदेवर बिनविरोध 

मुंबई : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. मात्र याची अधिकृत घोषणा दोन दिवसांनी केली जाईल. 

फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या तीन ऑक्‍टोबरला पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अडसड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या रिक्त जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल. 

अडसड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आदी भाजप नेते उपस्थित होते. अडसड हे दोन वेळा विधानसभेचे आमदार होते. तसेच केंद्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com