मोहन भागवत यांना अटक करा : आंबेडकर 

मोहन भागवत यांना अटक करा : आंबेडकर 

मुंबई : शस्त्रपूजनाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे अत्याधुनिक शस्त्रे आली कुठून, असा सवाल करत डॉ. मोहन भागवत यांना अटक करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी दिला. 

सीएसएमटी स्थानकासमोर कबीर कला मंचाने आयोजित केलेल्या निदर्शनाप्रसंगी आंबेडकर बोलत होते. ""देशाचे रक्षण करण्यासाठी तिन्ही सेना कार्यरत असताना संघाची ही चौथी सेना कशासाठी, असा सवाल करून नागपुरात संघाच्या शस्त्रपूजनानंतर अत्याधुनिक शस्त्रे बाळगण्याबाबत मोहन भागवत यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार झाली. मात्र, त्याचा तपास किंवा कारवाई झाली नाही. 

सामान्य माणसाच्या खिशात साधा चाकू सापडला तरी त्याला अटक करण्यात येते. मात्र स्वयंचलित हत्यारे पूजेसाठी वापरणाऱ्या संघावर कारवाई होत नाही. पंतप्रधान मोदीदेखील शस्त्रपूजन करायला संघाच्या कार्यक्रमात जातात. यांना हा अधिकार नाही. मोदींनी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी,'' असे आव्हान आंबेडकर यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com