सनातनचे प्रमुख डॉ.जयंत आठवलेंना अटक करा, विखेंची मागणी 

 सनातनचे प्रमुख डॉ.जयंत आठवलेंना अटक करा, विखेंची मागणी 

मुंबई : महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

आज पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते. डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात असले तरी सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घ्या. असे विखे पाटील म्हणाले. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत? त्यांच्याऐवजी त्यांचे दुसऱ्या अन्‌ तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते समोर येऊन खुलासे का करीत आहेत? असे प्रश्नही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केले. 

महाराष्ट्र एटीएसने मागील दोन आठवड्यांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी "नेटवर्क' समोर आले. अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे, याचा पत्ता लागला नसता, अशी बोचरी टीकाही विखे यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com