ark questionj shivsena about alliance piyush goyal | Sarkarnama

युती होईल काय हे प्रश्‍न मातोश्रीला विचारा : पियूष गोयल 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती होईल काय या प्रश्‍नाचे उत्तर मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनाही विचारा असे उत्तर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले. 

युतीसंबंधात विचारलेल्या प्रश्‍नांसंबंधी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षांची इच्छा सर्व घटक पक्षांना समवेत घेण्याची आहे. शिवसेना आमच्यासमवेत आहे. लोकसभेत आम्ही एकत्र काम करीत असतो. त्यांचे खासदार आमचे मित्र आहेत. ते मन की बात सांगत असतात.युती करायची आहे मात्र केंव्हा ते शिवसेनेलाही विचारा असेही त्यांनी नमूद केले. 

ट्‌वीटर आणि फेसबुकने खाजगी माहितीबददल नमूद केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी संसदेची समिती यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे ठरवेल तसेच निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख