arjun khotkar attack raosaheb dandve in jalna | Sarkarnama

मित्र पक्षातील शत्रूंना पद, पैसा, सत्तासंपत्तींचा माज चढलाय, मंत्री खोतकरांची दानवेंवर टीका 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जालना : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात कितीही मोठा पैलवान असला तरी त्याला चितपट करूच, आमच्या मित्र पक्षातील शत्रूंना पद, पैसा, सत्ता आणि संपत्तीचा माज चढलाय अशी जहरी टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांनी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यासाठी आम्ही खुर्च्या उचलल्या आज ते शिवसेनेला संपवण्याची भाषा करताहेत. आम्हाला संपवायला निघालेल्यांना आम्हीही संपविल्याशिवाय राहाणार नाही असा इशाराही खोतकर यांनी यावेळी दिला. 

जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज गटप्रमुखांचा मेळावा शहरातील फ़ुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भोकरदनमध्ये दानवेंची दबंगगिरी सुरू आहे. पोलीस यंत्रणेसह सर्वच यंत्रणा त्यांच्या आहारी गेल्या असून त्याचाही समाचार घेऊ असा इशाराही खोतकर यांनी दिला. 

जालना शहरात महाराष्ट्र केसरी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती देतानाच लोकसभेच्या कबड्डीत कितीही मोठा पैलवान येऊ द्या, त्याला चितपट करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख