शिवसेनेने भाजपसोबत युती केली तर आम्ही त्यांच्यासोबत नाही!

शिवसेनेसोबत युती करताना आम्हाला सत्तेत वाटा मिळेल असे वचन दिले होते मात्र अद्याप ते वचन पाळले गेलेले नाही. -अर्जुन डांगळे
शिवसेनेने भाजपसोबत युती केली तर आम्ही त्यांच्यासोबत नाही!

पुणे : रामदास आठवले भाजपसोबत गेले म्हणून आम्ही त्यांची साथ सोडून शिवसेनेसोबत राहिलो. आमच्यामुळे शिवसेनेचा फायदा झाला. येत्या निवडणुकीत जर शिवसेनेने भाजपसोबत युती केली तर आम्ही शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार, असा इशारा 'रिपब्लिकन जनशक्ती'नेते अर्जुन डांगळे यांनी दिला आहे.

"आम्ही आजवर भाजपला विरोध केलेला आहे. भाजपचा पराभव व्हायला पाहिजे, अशाच विचाराचे आम्ही आहोत. भाजपचा पराभव झाला पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीसह सगळ्या समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. समविचारी राजकीय पक्षाच्या मताचे विभाजन झाले तर पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार यात शंका नाही. त्यामुळे भाजप सत्तेत येणार नाही यासाठी सगळ्या पुरोगामी लोकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे."

"शिवसेनेला पाठिंबा देताना आमची भूमिका एकच होती, शिवसेना भाजपला विरोधात उभी राहत आहे. येत्या निवडणुकीत जर शिवसेनेने भाजपसोबत युती केली तर आम्ही शिवसेनेच्या विरोधात प्रचार करू,"असे डांगळे म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com