aricultural marketing office issue in akola | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पणन कार्यालयाच्या जागा मालकाने घेतला बच्चू कडूंचा धसका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

एक डिसेंबर पर्यंत कार्यालय सोडण्याची नोटीस जागा मालकाने पणन महासंघाला दिली आहे. 

अकोला : शेतकरी प्रश्नांबाबत वेळकाढूपणाचे धोरण स्विकारणारे जिल्हा पणन कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. या इशाऱ्याच्या धसका पणन महासंघाच्या कार्यालयासाठी जागा भाड्याने देणाऱ्या जागा मालकाने घेतला आहे. एक डिसेंबर पर्यंत कार्यालय सोडण्याची नोटीस जागा मालकाने पणन महासंघाला दिली आहे. 

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.2) शेकडो शेतकऱ्यांचा मुक्काम मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. तुर आणि हरबऱ्याचे पैसे 15 दिवसात देणार असे आश्‍वासन कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यावर बच्चू कडू यांनी मोर्चाचा मुक्काम रद्द केल्याची घोषणा केली. शासनाने दिलेले आश्‍वासन 15 दिवसात पुर्ण केले नाही तर जिल्हा पणन कार्यालय जाळून टाकू, असा इशारा आमदार कडू यांनी दिला होता. बच्चू कडू यांच्या या इशाऱ्याचा धसका जिल्हा पणन विभागाने कितीप्रमाणात घेतला याची माहिती नसली तरी आदर्श कॉलनी परिसरात ज्यांच्या घरात पणन महसंघाचे कार्यालय आहे त्या घराच्या मालकाने माझे घर एक महिन्यात रिकामे करा अशी नोटीस जिल्हा पणन विभागाला बजावली आहे.

संबंधित लेख