archana jadhav elected as chaairman of purandar Ps | Sarkarnama

पुरंदरच्या सभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना जाधव 

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

सासवड : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना समीर जाधव यांची बिनविरोध निवड झाली. त्या वीर पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या रूपाने तब्बल 39 वर्षांनंतर परिंचेला सभापतिपदी संधी मिळाली. दरम्यान, उपसभापती दत्ता काळे यांना तूर्त अभय मिळाले आहे. 

दीड वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीला तालुका पंचायत समितीवर प्रथमच भगवा फडकला होता. सभापती म्हणून शिवसेनेने अतुल म्हस्के यांना संधी दिली होती. मात्र, दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यावर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अर्चना जाधव यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संजय असवले यांनी काम पाहिले.

या वेळी म्हस्के, काळे, रमेश जाधव, नलिनी लोळे, प्रा. गोरखनाथ माने हे उपस्थित होते. निवडीनंतर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, शिवाजी पवार या वेळी उपस्थित होते. 
दरम्यान, म्हस्के यांच्या राजीनाम्यापाठोपाठ उपसभापती दत्ता काळे हेसुद्धा राजीनामा देण्याचे निश्‍चित मानले जात होते. मात्र, उपसभापती दत्ता काळे यांना तूर्त अभय मिळाले आहे. त्याबाबत शिवतारेंनी यांनीच खुलासा केला. 

संबंधित लेख