arafat shekh in bjp | Sarkarnama

शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख भाजपत 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

मुंबई : शिवसेनेचे उपनेते हाजी अराफात शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अराफत यांनी आज दुसऱ्यांदा पक्ष बदलला आहे. त्यांनी यापूर्वी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. 

े राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. शेख हे शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्ष होते.आयोगाच्या उपाध्यक्षपदासाठी निवड व्हावी यासाठी शेख शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे लॉबींग करीत होते. मात्र शिवसेनेऐवजी भाजपनेच त्यांची निवड केली. शेवटी त्यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करीत कमल हाती धरले. 

शेख हे शिवसेनेचे उपनेते होते. उपनेत्याने कोणताही गाजावाजा न करता थेट पक्षात भाजपत प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. शेख यांच्या निणर्ययावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  

संबंधित लेख