appoint two executive presidents for congress in Maharashtra | Sarkarnama

प्रदेश कॉंग्रेसला दोन कार्याध्यक्ष द्या : पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी 

उमेश घोंगडे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना मदत करण्यासाठी दोन कार्याध्यक्ष नेमण्याची मागणी कॉंग्रेसमधून पुढे आली आहे. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक रविवारी पुण्यात झाली. बैठकीला करण्यात अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे निरीक्षक सोनल पटेल व अशिष दुवा उपस्थित होते. बैठकीत शहर पातळीवरील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 

दोन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची मागणी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी बैठकीत केली. पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाडा अशी स्वतंत्र जबाबदारी दोन कार्याध्यक्षांना देण्यात यावी.हे दोन्ही कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना मदत करतील. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेचे काम महत्वाचे आहे, असे मत बालगुडे यांनी बैठकीत व्यक्त केले. राज्यातील जवळपास सर्व महापालिकेतील कॉंग्रेसची सत्ता गेली आहे. पक्ष संघटना खिळीखिळी झाली आहे. पक्षाची संघटना नव्या मजबुतीने उभी राहण्यासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

निष्ठावंतांना न्याय द्या, हे तर जवळपास प्रत्येक पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र इतर पक्षातून येणाऱ्यांना पक्षात घेऊन नका हे सांगायलाही पदाधिकारी विसरले नाहीत. मी सहावेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो तरी अजून नगरसेवकच आहे, असे आबा बागूल यांनी सांगितले. संघटना मजबूत करण्याच्या उपाययोजनांबरोबरच सोशल मीडियाचा वापर अधिक आक्रमकपणे करायला हवा, असे मत माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी व्यक्त केले.

संघटना बांधणीच्या पातळीवरदेखील अधिक लक्ष देण्याची गरज छाजेड यांनी मांडली. ब्लॉक कॉंग्रेसच्या नेमणुका आवश्‍यक आहेत. त्यातून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख