appa rally in new delhi tomorrow | Sarkarnama

"आप'च्या रॅलीचे राहुल गांधींना निमंत्रण 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी "आप'ने कंबर कसली आहे. उद्या (बुधवार) नवी दिल्लीत आयोजित केलेल्या " तानाशाही हटाओ, लोकतंत्र बचाव' या मेगा रॅलीला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण "आप'च्या वतीने देण्यात आले आहे. 

"आप'चे नेते संजयसिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, की या मेगा रॅलीला ज्यांना निमंत्रण देण्यात आले आहे त्यामध्ये राहुल यांचा समावेश आहे. राहुल यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे नेते तेजस्वी यादव, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींचा समावेश आहे. 

ममता बॅनर्जी यांनी नुकतीच तशी रॅली पश्‍चिम बंगालमध्ये आयोजित केले होते. त्या रॅलीला हे सर्व वतनदार नेते उपस्थित होते असे "आप'चे निमंत्रक गोपाळ राय यांनी सांगितले. 

संबंधित लेख