anup dhotre and akola | Sarkarnama

अकोल्याच्या राजकारणात "नव्या खेळाडू' चा प्रवेश

श्रीकांत पाचकवडे
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

अकोलाः आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांची राजकारणात जोरदार एन्ट्री झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनुप धोत्रे जिल्ह्यातील पक्षाच्या विविध सभांसह अनेक सामाजिक उपक्रम व विविध कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित राहुन मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अनुप धोत्रे कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अकोल्याच्या राजकारणात या नव्या खेळाडूची दमदार एन्ट्री झाल्याने राजकारणाच्या सारीपाटावर ते काय चाल खेळणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींच्या मोर्चेबांधणीसाठी कामाला लागले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील पाच विधानससभा मतदारसंघापैकी भारिप बहुजन महासंघाचा बाळापुर मतदारसंघ वगळता भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्‍चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, मुर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे आणि अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या ताब्यात आहे. 

जिल्ह्यात मजबुत असलेले पक्षसंघटन आगामी निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर अधिक सक्रीय करण्यासाठी खासदार धोत्रे यांनी रणनिती आखली आहे. त्यासाठी खासदार संजय धोत्रे यांचे सख्ये भाचे असलेले आमदार रणधीर सावरकर यांच्याप्रमाणेच अनुप धोत्रे यांची राजकारणात जोरदार एन्ट्री झाली आहे. बिझनेस ×ऍडमिस्ट्रेशनची पदवी घेतलेले अनुप हे त्यांच्या सोनल इंडस्ट्रिजचे कामकाज पाहतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अनुप हे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ पिंजून काढत ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी करीत आहेत. पक्षाच्या बैठका, सभांप्रमाणेच शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या सामाजीक कार्यक्रमात अनुप यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. 

राजकारणात घराणेशाही वाढत असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र, युवा पिढीतील उच्चशिक्षीत, मितभाषी आणि तळा-गाळातील जनतेचे प्रश्न समजून घेणारे युवा नेतृत्व राजकारणात उदयास येत असेल तर विकासाच्या नव्या वाटा खुल्या होत असल्याचा आजपर्यंत अनेक राजकीय घराण्यांचा इतिहास आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांचे सुपूत्र अनुप धोत्रे यांची राजकारणात होत असलेली दमदार एन्ट्री त्याचेच प्रतीक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार असलेले आजोबा (कै.) शामरावजी धोत्रे, वडिल खासदार संजय धोत्रे आणि मामेभाऊ रणधीर सावरकर या सारख्या दिग्गज नेत्यांकडून राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असल्याने राजकारणाच्या सारीपाटावर तो कोणती चाल खेळणार याबद्दल औत्सुक्‍य आहे. 

संबंधित लेख