anti enchorchment drive against temple | Sarkarnama

गणेश नाईकांनी प्रतिष्ठा पणाला लावलेले मंदिर अखेर पाडलेच

सुजित गायकवाड
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सर्व धर्म धार्मिक स्थळे बचाव समितीला फटकारल्यानंतर अखेर पावणे परिसरात एमआयडीसीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बावखळेश्‍वर मंदीरांवर मंगळवारी दुपारनंतर कारवाईला सुरूवात झाली. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने आलिशान मंदीरांचे बांधकाम पाडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू होती. मंदीरांवर केलेल्या या कारवाईमुळे नवी मुंबईतील राजकीय नेत्यांच्या प्रस्थापित संस्थांना सुरूंग लागण्यास सुरूवात झाली आहे.

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सर्व धर्म धार्मिक स्थळे बचाव समितीला फटकारल्यानंतर अखेर पावणे परिसरात एमआयडीसीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बावखळेश्‍वर मंदीरांवर मंगळवारी दुपारनंतर कारवाईला सुरूवात झाली. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने आलिशान मंदीरांचे बांधकाम पाडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू होती. मंदीरांवर केलेल्या या कारवाईमुळे नवी मुंबईतील राजकीय नेत्यांच्या प्रस्थापित संस्थांना सुरूंग लागण्यास सुरूवात झाली आहे.

माजी मंत्री गणेश नाईक यांनी हे मंदिर वाचविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दिवाळी आधी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एमआयडीसी व पोलीस यंत्रणांना कारवाईत चालढकलपणा केल्याबद्दल तिव्र शब्दात कानउघडणी करून कारवाईसाठी अंतिम मुदत दिली होती. त्यानुसार एमआयडीसी व पोलिसांना 26 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा असल्याने मंगळवारी दुपारनंतर कारवाईला सुरूवात झाली.

सोमवारी सकाळपासूनच एमआयडीसीने पोलीस बंदोबस्तात जेसीबी, पोकलॅन, ट्रक व कामगार असा लवाजमा नेऊन यंत्रणा कारवाईसाठी सज्ज ठेवली होती. त्यादरम्यान नवी मुंबईतील सर्व धर्म धार्मिक स्थळे बचाव समिती पुन्हा कोर्टात गेल्याने यंत्रणा त्यांच्या प्रतिक्षेत होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने समितीचा अर्ज याआधीच फेटाळल्यामुळे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणे समितीला शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर चारच्या सुमारास कारवाईस सुरूवात झाली.

तोडण्याच्या कारवाईआधी ट्रस्टच्या सदस्यांनी तीन मंदीरातील मूर्ती विधीवत धक्का न लागता काढून घेतल्या. त्यानंतर मंदीर रिकामे झाल्यावर परिसरात तोडण्याची कारवाई सुरू झाली. चार वाजता सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लवकरात लवकर बांधकाम तोडून तसेच मलबा हटवून एमआयडीसीला हा भूखंड ताब्यात घ्यायचा आहे. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी एमआयडीसीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्यासहीत सर्वांचे लक्ष आहे. मंदीरावरील कारवाईमुळे अनेक वर्षांपासून शहरात कोट्यावधी रूपयांची माया गोळा करून थाटलेल्या बलाढ्य संस्थानिकांच्या साम्राज्याला हादरा बसण्यास सुरूवात झाली आहे. 

आरोप- प्रत्यारोप 

बावखळेश्‍वर मंदीरावर झालेली कारवाई राजकीय आकसापोटी झाल्याचा आरोप सर्व धर्म धार्मिक स्थळे बचाव समितीने केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदीराला नियमित करण्याबाबतचे धोरण तयार करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र तरी देखील एमआयडीसीचे मंत्री असलेले शिवसेनेचे सूभाष देसाई यांनी राजकीय सुड उगवण्यासाठी बावखळेश्‍वर मंदीराला नियमित होऊ दिले नाहीत. शिवसेनेने एकीकडे आयोध्यात राम मंदीर उभारण्याच्या गोष्टी करणाऱ्या आणि स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून मिरवणाऱ्यांचे बूरखे फाटले असल्याचा आरोप सर्व धर्म धार्मिक स्थळे बचाव समितीने केला आहे. 

मंदीर पाडणे ही बाब दूर्दैवीच आहे. मात्र न्यायालयाच्या या कारवाईने भूमाफियांना सणसणीत चपराक मिळालेली आहे. आयोध्याच्या ठिकाणी अनैतिक आणि काळे उद्योग चालत नव्हते. याठिकाणी परमेश्‍वराच्या सान्निध्यात भूमाफिया काळे उद्योग करीत होते. हे शहरातील सर्व नागरीकांना माहित आहे. उगीच लंगड्या सबबीखाली लोकांची फुसवणूक करू नका. यापूढेही शिवसेना बाकीचे काळे उद्योग उजेडात आणणार आहे, असे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले.

संबंधित लेख