अशक्तपणामुळे अण्णा हजारे नगरच्या रुग्णालयात दाखल

अशक्तपणामुळे अण्णा हजारे नगरच्या रुग्णालयात दाखल

नगर : अशक्तपणा जास्त जाणवत असल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज नगरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

मागील आठवड्यात केलेल्या उपोषणामुळे अशक्तपणा जास्त जाणवत असल्याने त्यांच्यावर राळेगणमध्ये उपचार सुरू होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अॅडमीट करण्यात आले.

दरम्यान, अण्णा हजारे यांना अशक्तपणामुळे अस्वस्थ वाटत आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे. विविध तपासण्या केल्या जात असून, आमची टीम त्यांची काळजी घेत असल्याचे नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. बापुसाहेब कांडेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com