anna bhuau sathe bharat ratana | Sarkarnama

अण्णा भाऊ साठेंची भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य सरकार शिफारस करणार 

गोविंद तुपे 
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे राज्य सरकार अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीरीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मनात चळवळीचा अंगार पेरण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले. गरीब, कष्टकरी कामगारांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडत साहित्यात भरीव काम केले आहे. जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या या लोकशाहिराचा उचित गौरव करावा अशी मागणी गेल्या कित्येक दिवसापासून विविध सामाजिक संघटना लावून धरली आहे. त्याची दखल घेत या समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी मुख्यमंत्र्यानी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती मुख्यमंत्र्याकडे लवकर पुरस्कारांसंदर्भात बैठक घेऊन अण्णा भाऊ साठे यांच्या नावाची केंद्रसरकारडे शिफारस करणार असल्याची माहिती दिलीप कांबळे यांनी सांगितले.  

संबंधित लेख