ankush kakade refutes sujit zaware`s claim | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

राष्ट्रवादीची नोटीस मिळालेल्या सुजित झावरेंच्या दाव्यावर अंकुश काकडेंचे पाणी

मुरलीधर कराळे
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पारनेर बाजार समिती सभापतिवर आलेल्या अविश्वास ठरावामुळे राष्ट्रवादीत वादळ उठले आहे. पारनेरचे सुजित झावरे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर झावरे यांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याच्या पक्षाच्या सूचना असल्याचे सांगितले. तो दावाही पक्ष निरीक्षकांना फेटाळला आहे.

नगर : पारनेर बाजार समितीत झालेल्या अविश्वास ठरावाबाबत शेट शिवसेनेशी हातमिळविणी केल्याने सुजीत झावरे यांना राष्ट्रवादी काॅग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. झावरे यांचे म्हणणे सात दिवसांत आल्यानंतर काय तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतील. अद्याप याविषयी कोणताही निर्णय झाला नाही, असे राष्ट्रवादी काॅग्रेसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

याबाबत काकडे यांनी सांगितले की बाजार समितीच्या सभापती बदलाबाबत झावरे यांनी पक्षातील वरिष्ठांना कळविणे आवश्यक होते. सभापतीपदाचा राजीनामा मागण्याआधी वरिष्ठांशी चर्चा केली असती, तर त्यातून मार्ग काढता आला असता. परंतु त्यांनी थेट शिवसेनेशी हातमिळवणी केली. हे धोरण पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी झावरे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यात सात दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्य़ंत झावरे यांनी त्यांचे म्हणणे मांडून योग्य तो निर्णय नोटीस दिल्यानंतर सात दिवसानंतरच घेतला जाईल, असे काकडे म्हणाले.

पक्षाकडून नोटीस मिळाली असली तर इकडे झावरे हे पवार साहेबांनी आपल्याला विधानसभेची तयारी करायला सांगितल्याचा संदेश कार्यकर्त्यांना देत आहे. त्यामुळेही तालुक्यात पक्षात नक्की काय चालले आहे, याची चर्चा सुरू आहे. याबाबत काकडे यांना विचारले असता विधानसभेच्या तयारीबाबत पवार यांनी कोणालाही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे कोणी काहीही सांगत असले, तरी ते आदेश देतील त्याच वेळी उमेदवारीबाबत चर्चा होईल. त्यामुळे झावरे यांना विधानसभेची तयारी करण्याबाबत सांगितल्याच्या अफवा आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. शरद पवार एक आॅक्टोबरला नगरला येणार आहेत. त्या वेळी याविषयी काही चर्चा होऊ शकते, असेही काकडे म्हणाले.

संबंधित लेख