ankush kakade press in nagar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

संग्राम जगतापांनी केलेला पराभव अजून अनिल राठोडांना बोचतो आहे!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

राम मंदिराचा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

नगर : शिवसेनेचे अनिल राठोड यांचा आमदार संग्राम जगताप पराभव केल्याने त्याचे शल्य राठोड यांना बोचते आहे. त्यामुळे ते विनाकारण आरोप करीत सुटतात.

भाजपमधील अंतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी पळवापळवचे राजकारण करावे लागले. केडगावची घटना म्हणजे त्यांचे हे राजकारण कुचकामी असल्याचा पुरावा आहे. असे राजकारण टिकत नसते. काहीही घटना घडोत, पण महापौर राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी व काँगेसच्या आघाडीच्या प्रचारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना व भाजपवर हल्लाबोल केला. महापालिकेच्या प्रचारात आपण दुसऱ्या पक्षाने काय केले, यापेक्षा आम्ही काय करणार, विकास कसा करणार हे सांगणार आहोत, असे सांगितले.

काकडे म्हणाले, राम मंदिराचा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकी जवळ आल्या की लक्ष विचलित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. शहरात सत्ता असतानाही त्यांना काहीही करता आले नाही. शहराचे प्रश्न जुनेच आहेत. उलट आमदार संग्राम जगताप यांनी शहरात अनेक कामे केली. त्याच कामाचे श्रेय घेण्याचा विरोधक प्रयत्न करीत असतात. त्यांनी आरोप करण्यापेक्षा निवडणुकांत विकासावर बोलावे.

ईव्हीएम मशिनबाबत काकडे म्हणाले, या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकार दखल घेत नाहीत. इव्हीएम मशिनमध्ये होत असलेल्या गडबडीबाबत अजूनही लोकांमध्ये अनेक शंका आहेत. त्यांचे निरसन कोणीच करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

नगर महापालिकेत आघाडीला चांगले वातावरण आहे. आमदार जगताप यांच्याकडून झालेली कामेच मतदारांना आकृष्ठ करणार आहेत. शिवाय आम्ही दिलेले उमेदवारही त्या-त्या प्रभागात जनतेशी समरस होऊन काम करीत आहेत. त्यामुळे ते निवडून येण्याबाबत शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संबंधित लेख