anjalitai ambedekar | Sarkarnama

महिलांमध्ये मोठी शक्ती, नेत्यांची वाट नका पाहू, तुम्हीच करा नेतृत्व - अंजलीताई आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

नाशिक : तुमचे प्रश्‍न, तुमच्या अडचणींसाठी कोणीतरी येईल अशी अपेक्षा कशाला करता. महिलांमध्ये मोठी शक्ती असते. त्यामुळे नेत्यांची वाट नका पाहू. तुम्हीच नेतृत्व करा अन्‌ गोरगरीबांचे प्रश्‍न सोडवा.' असा सल्ला अंजलीताई आंबेडकर यांनी महिलांना दिला. भारिप-बहुजन महासंघ महिला आघाडी नाशिक जिल्हा व तालुक्‍याच्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी महिलांच्या मुलाखती झाल्या. यावेळी महिलांचा मेळावा झाला. या मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, सावित्रीच्या लेकींनो पुढाकार घेऊन तुम्हालाच नेतृत्व करायचे आहे. या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, अल्पसंख्याक महिलांच्या प्रश्‍नावर ताकदीने उभे राहिले पाहिजे. आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी महिला आघाडीच्या महिलांनी न्याय मिळवून दिला पाहिजे. भारिप-बहुजन महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांती संघर्षचा एक वेगळा विचार प्रवाह घेऊन काम करीत आहेत. हाच विचार प्रवाह मनात रुजवून तळागाळातील महिलांना एकजूट करून समाजाचाच विचार रुजवत आला. तो आत्मविश्‍वास महिलांमध्ये रुजवून क्रांती घडविण्यासाठी सावित्रीच्या लेकींनो नेतृत्वासाठी सज्ज व्हा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. 

नाशिक-पुणे रोडवरील श्रीकृष्ण लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी अरुंधती शिरसाठ, डॉ. निशाताई शेंडे, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, माधुरी भोळे, उज्ज्वला गायकवाड, प्रतिभा जाधव, उर्मिला गायकवाड, शारदाताई दोंदे, सारिका साळवे, बंटी साळवे, रामकांत वाघ, उल्हास गायकवाड उपस्थित होते. 
 
संबंधित लेख